कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: पिंपळगाव (पान) येथील जि. प. प्राथ. शाळेत व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद ढाळे यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पिसाळ होते. उपस्थित मुलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक साहित्याचे वाटप करून पिंपळगाव (पान) येथे महात्मा फुले जयंती साजरी
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पिसाळ, मनोज ढाळे, नागनाथ गायकवाड, शर्फोद्दीन मुलाणी, अमोल कोळी, उपशिक्षिका सुचिता बारकुल, अंगणवाडी कर्मचारी बानुबी मुलाणी, सुनिता भंगुरे, जनाबाई कांबळे, अर्चना क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्ताञय गोरे यांनी केले. अमोल कोळी उपस्थितांचे आभार मानले.
(Celebration of Mahatma Phule Jayanti at Pimpalgaon (Paan) by distributing educational materials)