कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पांगरी ता. बार्शी येथील राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. महावितरणचे अभियंता धनराज भारती यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलकुमार जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
राजीव गांधी आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
यावेळी संस्थेचे संस्थापक प्रा. संजीव बगाडे, संचालिका सुलभा जगताप, संचालक शिवाजी चव्हाण, मुख्याध्यापिका किरण बगाडे, उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे, अधीक्षक वाहिद शेख, राहुल बगाडे, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक संजय सोनवणे, अक्षय मुंढे, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रस्ताविक शिवाजी बगाडे यांनी तर सूत्रसंचालन शैलेजा राऊत यांनी केले.