कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पांगरी येथील श्री माऊली पतसंस्थेत उत्साहात साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्री माऊली पतसंस्थेत शिवजयंती उत्साहात साजरी
यावेळी विष्णू पवार, विजय गरड, धनंजय तौर, कमलाकर पाटील, अच्युत मुळे, पतसंस्थेचे चेअरमन वशिष्ठ गोरे, सचिव रवींद्र जाधव, उपाध्यक्ष विलास जाधव, कर्मचारी व पिग्मी एजंट उपस्थित होते.