कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
ओबीसी आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन आज करण्यात आले. जिल्ह्यातील येडशी टोल नाका, तामलवाडी टोल नाका याठिकाणी भाजपने आंदोलन केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात विविध आघाड्यांचे प्रमुख, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या.
ओबीसी आरक्षणासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात चक्काजाम
मागास आयोगाच्या माध्यमातून तात्काळ कालबद्ध कार्यक्रम जाहीर व्हावा, एम्पिरिकल डेटा उपलब्ध आहे त्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करावा, ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करावे तसेच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत त्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत घेण्यात येऊ नयेत या मागण्यांसाठी हे आंदोलन आम्ही करीत आहोत. ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. राणाजगजितसिंह पाटील, आमदार भाजपा.