कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील पांगरी गावचे सुपुत्र तथा माढा तालुक्यातील कन्हेरगाव शाळेचे मुख्याध्यापक किशोर बगाडे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजीराजे राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने पंढरपूर येथील संमेलनात सन्मानित करण्यात आले. (Chhatrapati Sambhaji Raje Award to Kishor Bagade son of Pangri village in Barshi taluka)
बार्शी तालुक्यातील पांगरी गावचे सुपुत्र किशोर बगाडे यांना छत्रपती संभाजीराजे पुरस्कार
श्रीमंत अमरसिंह राजे जाधवराव (सिंदखेडराजा), श्रीमंत युवराज संभाजी राजे (तेजावर, तामिळनाडू), इतिहास संशोधक डॉ. शोभा शिरणढोणकर, अभिजीत पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, ज्ञानेश्वर पतंगे, प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक, जिल्हाध्यक्ष पंडितराव लोहकरे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी केंद्र प्रमुख मनोज पवार, मुख्याध्यापक अमोल लोंढे, विकास उकिरडे, मनोज गादेकर, माधवराव सांगळे, रोहित शिंदे, उमेश गाढवे, नामदेव जगदाळे, विजय शिंदे, आनंदराव गोडसे, गणेश गोडसे, संजय बोकेफोडे, प्रमोद शिंदे, शिवदास कुबेर, दिनेश उरमोडे आदी उपस्थित होते.