कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील पांगरी येथील राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
राजीव गांधी आश्रमशाळेत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे व विकास शिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, साक्षी बगाडे, प्रतीक घावटे, आकाश ओव्हाळ, सिद्धी बगाडे, संध्या वहाळ या विद्यार्थ्यांनी भाषणे पोवाडे व गीते यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करण्यात आला.
उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे व बालाजी घावटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितली. प्रस्तावना शैलेजा राऊत तर सूत्रसंचालन शिवाजी बगाडे यांनी केले. याप्रसंगी अधीक्षक वाहिद शेख, शिवशंकर धारूरकर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.