आसिफ मुलाणी कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
कारी परिवर्तन सेवाभावी संस्थेच्या वतीने गावच्या वेशीवर भगवा फडकवून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राजेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पुष्पराज यादव, परीक्षितराजे विधाते, अविनाश कावळे, गजानन गंभीर, संतोष जगदाळे, बाळासाहेब गादेकर, कल्याण डोके, राहुल डोके, महेश व्हटकर, आसिफ मुलाणी, महेश पवार, तुषार माने, बापू वाघे, महेश करळे, किशोर गादेकर आदी उपस्थित होते.
कारीत विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

जय हिंद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल तेलंगे, दिनेश खंडागळे, विक्रम तेलंगे, विजय जाधव, आदेश जाधव, भैय्या गुरव, अंकुष गुरव, महेश जाधव ,राहुल पवार, आबा शितोळे, गणेश देसाई, सौरभ जाधव, अंकुश शिंदे, रोहित जगताप, तुषार चौधरी, बाळू गुरव, विजय चौधरी, आकाश डोके, अभिजित जगताप, सुरज निंबाळकर, योगेश पवार, सोन्या करळे, संतोष बनसोडे गणेश चौधरी विजय काळे आदी उपस्थित होते.