दयानंद गौडगांव:कुतूहल न्यूज नेटवर्क
कट्टर शिवभक्त प्रतिष्ठान आकुर्डी आयोजित शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरी
निगडी : राज्यभरात दरवर्षी अगदी थाटामाटात साजरा करण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आकुर्डी येथील कट्टर शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिवजयंती उत्सव यंदा प्रशासनाने घातलेला निर्बंध आणि सामाजिक भान ठेवून अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवा फुलारी, उपाध्यक्ष रमेश थोरात यांच्या समावेत निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाला युवराज साठे, प्रशांत जाधव, उमेश राठोड, पत्रकार दयानंद गौडगांव, महादेव शेंडगे, रमेश सोरेगांव, गिरीश बंडगर आदी मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.