कुतूहल न्यूज नेटवर्क
बीड: गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर बीडचे तहसीलदार आणि एक कर्मचारी जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेलतला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी जात असताना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर दोन वाजण्याच्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेली ब्रेझा गाडी रस्त्याची खाली जाऊन झाडावर धडकली. यामध्ये मंडळ अधिकारी नितीन जाधव (वय ३९ रा.बीड) जागीच ठार झाले, तर बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके आणि एक कर्मचारी जखमी झाले आहेत.