कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकाने मागितलेली माहिती प्रशासनाने नागरिकांना गतीने दिली पाहिजे. तरच अर्ज पेंडिंग राहणार नाहीत आणि नागरिकांना माहिती मिळण्यास सुलभता निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्यस्तरीय प्रशिक्षक माहिती अधिकार तज्ञ शिवाजीराव पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
नागरिकांना मागितलेली माहिती गतीने मिळाली पाहिजे-शिवाजीराव पवार
बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने अधिकारी आणि कर्मचारी यांच्या करिता आयोजित करण्यात आलेल्या माहिती अधिकार अधिनियम २००५ या कार्यशाळेच्या प्रसंगी ते बोलत होते कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केले.
पवार बोलताना पुढे म्हणाले, माहिती अधिकार कायदा हा नागरीकांना माहिती मिळण्यासाठी असल्यामुळे नागरिकांनी अर्ज केल्यानंतर प्रशासनातील माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. तसेच नागरिकांनी या कायद्यांतर्गत माहिती मागितली पाहिजे. इतर प्रशासना पैकी पोलीस विभागाला कायद्याच्या कलम ८ नुसार काही माहिती वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता यावी आणि नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती. कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या वेळी सांगण्यात आल्या.
राज्यातील कोणत्याही कार्यालयांमध्ये कार्यालयातील अभिलेख पाहण्यासाठी दर सोमवारी उपलब्ध राहून माहिती पाहता येईल असे पवार यांनी सांगितले. यावेळी अर्ज कसा करावा, प्रथम अपील कसे करावे, अभिलेख पाहणी इत्यादी गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात आल्या. प्रशिक्षणानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या आणि काही तरतुदीबद्दल चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक क्रणेवाड, पोलीस उपनिरीक्षक ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक घाटोळे सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाठ यांनी केले.
(Citizens should get the requested RTI information quickly says Shivajirao Pawar)