कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात गाव पातळीवर शासनाच्या विविध कामांना गती यावी व होत असलेली कामे पारदर्शक व्हावी, ग्रामस्तरावरील रेशन दक्षता समितीची मिटिंग दर महिन्याला नियमित्त व्हावी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या परिवारातील कुटुंबाला अर्थ सहाय्य मिळावे, सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा या विविध मागणीचे निवेदन महिला राजसत्ता आंदोलक समितीच्या वतीने बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत यांना देण्यात आले.
बार्शी-महिला राजसत्ता आंदोलक समितीच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन
रोजगार हमी योजनेची कामे पंचायती मार्फत वर्षभर काढावीत, सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेची मिटिंग प्रकरणे नियमित निकाली काढावीत, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गाव पातळीवर चावडीवाचन निमित कार्यक्रम घ्यावा, ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समिती निर्माण करून तालुकास्तरावर प्रशिक्षण द्यावे.
तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दोन टक्के निधी आपत्ती व्यवस्थापन साठी राखून ठेवण्यात यावा अशा विविध मागणीचे निवेदन बार्शी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर सावंत यांना देण्यात आले. यावेळी शारदा गायकवाड, रेश्मा लंगोटे, रूपाली सावंत, मैना भोसले, मनीषा निंबाळकर, पुष्पा कुरूंद आदी उपस्थित होत्या.