कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील अमोल वसंत जाधव यांनी तुंबलेल्या गटारी साफ न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन कारी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आनंत सोनटक्के यांना दिले आहे.
कारीतील तुंबलेल्या गटारी साफ न केल्यास अमोल जाधव करणार आमरण उपोषण
या निवेदनात जाधव यांनी असे म्हटले आहे की, गटारी च्या समस्या वारंवार सांगून सुद्धा ग्राम विकास अधिकारी व सरपंच यांनी त्यावर दुर्लक्ष केले असून मी राहत असलेल्या ठिकाणच्या गटारी मध्ये शौचालयाचे पाणी सोडले आहे. त्याठिकाणी दुर्गंधी व घाण वास सुटला आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यांना तोंडी सांगूनही वारंवार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मी दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कारी च्या समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. या घटनेला सरपंच व अधिकारी जबाबदार असतील असे या निवेदनात म्हटले आहे.
दोन दिवसांवर गुढीपाडव्याचा सण असल्याने ऐन सणासुदीत नागरिकांच्या घरासमोर घाण नको म्हणून आम्ही 14 तारखेला गटारी स्वच्छ करण्याचं काम सुरू करणार आहोत- अनंत सोनटक्के, ग्रामविकास अधिकारी, कारी ग्रामपंचायत.
सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गटारी तुंबल्याने याठिकाणी डास व आळ्या झाल्या आहेत. वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने मी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.- अमोल जाधव, सामाजिक कार्यकर्ते, कारी.