fbpx

बार्शी येथे उडान फाऊंडेशनतर्फे कब्रस्तानची सफाई

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी: सामाजिक उपक्रमचा एक भाग म्हणून बार्शी येथील उडान फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम कब्रस्तानमधील वाळलेले गवत, काटेरी झुडपे, पाऊलवाट, अंतर्गत रस्ते आदी ठिकाणी साफसफाई अभियान सुरु करण्यात आले आहे. या समाजातील जिव्हाळ्याचा प्रश्न उडान फाउंडेशन बार्शी व ऑल मुस्लिम समाज बार्शीच्या वतीने पाठपुरावा केला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे प्रलंबित होता. त्याला सुरवात झाली.

या स्वच्छता मोहिमेत उडान फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख व उपाध्यक्ष इलियास शेख, जफर शेख, सल्लागार इन्नुस शेख, शब्बीर वस्ताद, सचिव जमील खान, कार्याध्यक्ष शकील मुलाणी, खजिनदार शोहेब काझी, रॉनी सय्यद,ॲड.रियाज शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, मोईन नाईकवाडी, सकलेन पठाण, बाबा शेख, इकबाल शेख, इरफान बागवान, जिलानी शेख, मुन्ना बागवान, आयुब शेख, तोसिफ बागवान, इलियास शेख, सादिक काझी, वसीम मुलाणी, अल्ताफ शेख, रियाज बागवान, मोहसीन दिल्लीवाले, एजाज शेख, आबु पठाण, राजु शिकलकर आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *