निगडी प्रतिनिधी : पुण्यातील तळेगाव औद्योगिक वसाहतीतील सर्वात मोठी कंपनी जनरल मोटर्स ही कंपनी कामगारांना कोणतेही पुर्व सुचना न देता चीन मधील ग्रेट वॉल या कंपनीला विकण्यात आली आहे. त्यामुळे हजारो कामगारांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे.
१७ जानेवारी २०२० रोजी ही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड व चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स कंपनीसोबत माग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत सामंजस्य करार केला आहे. परंतु सध्यस्थितीत केंद्र शासनाकडून परवानगी मिळणे अडचणी झाल्यामुळे जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २० नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून कंपनी बंद करण्याची परवानगी मागितली आहे. या दोन्ही घटना परस्परविरोधी आहेत. त्यामुळे कंपनीतील १ हजार ५७८ कायमस्वरूपी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जनरल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सर्व कामगारांची सेवा कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी कंपनीतील कामगार करीत आहेत.
शिवाय स्थानिक मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनीही कामगारांच्या सेवा कायम राखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हंटले आहे.