fbpx

बार्शीत रविवारी सीताफळ ऊत्पादन व तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे आयोजन

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील मधुबन फार्म अँड नर्सरी आणि लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी बार्शी येथे शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही. बार्शी येथे परंडा बायपास चौकात सीताफळ किंग डॉ. नवनाथ कसपटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या मधुबन फार्म अँड नर्सरीच्या परिक्षेत्रात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे ‘भव्य शेतकरी मेळावा’ आणि ‘सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे या मेळाव्यात ऑनलाईन सहभागी होणार असून, विद्यापीठाचे कृषी विस्तार, प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. संजय पांडुरंग पांढरे हे या चर्चासत्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. नवनाथ कसपटे कीड-रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात ४२ सीताफळ वाणांची प्रक्षेत्रावरील लागवड तसेच सीताफळ पीक उत्पादनाची विविध प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत. तसेच चर्चासत्रात सीताफळ लागवडीसंदर्भात पूर्वमशागत व पूर्व नियोजन, योग्य जातीची निवड, रोपांची योग्य लागवड पद्धत, कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन, सीताफळ विक्री व्यवस्थापन या विषयांवर उपस्थित सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मेळावा व चर्चासत्रासाठी कसलीही फी आकारण्यात आलेली नसून, यावेळी सोशल डिस्टंन्सींग व मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असल्याने आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे. आगावू नोंदणीसाठी ९९२३१३७७५७ किंवा ९८८१४२६९७४ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन रवींद्र कसपटे व प्रविण कसपटे यांनी केले आहे. तर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष अजित देशमुख व पदाधिकारी यांनी केले आहे.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा !  या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *