मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय माढा व शासकीय रुग्णालय सोलापूरला होणार आहे.
मोतीबिंदूच्या रुग्णांना दिलासा ; पांगरीच्या कृती समितीला यश
कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : कोरोना सारख्या महामारीच्या संकटामुळे पुणे येथे होत असलेली मोफत शस्त्रक्रिया बंद झाले होते.त्यामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील मोतीबिंदूच्या मोफत सेवेला गरीब व गरजू रुग्ण मुकले होते. वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मोतीबिंदूचे रुग्ण संख्या वाढत होती.जेवढा उशीर तेवढा रुग्णाच्या अंधत्वाचा धोका मोठा होता.गरीब व असाह्य रुग्णाच्या अंधत्वाला कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण झाला होता.
हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अॅड.अनिल पाटील यांच्या पुढाकाराने व विष्णू पवार यांच्या सहकार्याने एक कृती समितीची स्थापना करण्यात आली.या समिती मार्फत अल्पावधीतच उच्च अधिकारी व पदाधिकारी यांचे कडे निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली.त्यामुळे मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय माढा व शासकीय रुग्णालय सोलापूरला होणार आहे.या बाबत पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक रवींद्र माळी यांनी कृती समितीचे उपाध्यक्ष विष्णू पवार यांना समक्ष भेटून सांगितले व शासनाच्या निर्णयाला दुजोरा दिला.
समितीचे सचिव इरशाद शेख व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.