कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पांगरी ता. बार्शी येथील राजीव गांधी केंद्रीय आश्रम शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून अनिल खुणे उपस्थित होते. सर्वप्रथम मुख्याध्यापिका किरण बगाडे, उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे, प्रमुख पाहुणे अनिल खुणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राजीव गांधी केंद्रीय आश्रमशाळेत संविधान दिन साजरा
प्रस्ताविक शिवाजी बगाडे यांनी केले. विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले, अनिल खूने यांनी संविधानाबद्दल माहिती सांगितली मुख्याध्यापिका किरण बगाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रवेशिका शैलजा राऊत, शिवाजी बगाडे, अधीक्षक वाहिद शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount