fbpx

वडोलीत तालुकास्तरीय बचत गटांचा महामेळावा

कुतूहल न्यूज नेटवर्क
माढा: वडोली ता.माढा येथे नेहरू युवा केंद्र सोलापूर व नेहरू युवा मंडळ वडोली यांच्या वतीने तालुकास्तरीय बचत गटांचा महामेळावा संपन्न झाला. यात २०० महिलांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी उपस्थित होते. अजित कुमार यांनी बचत गटाचे महत्व व फायदे यांचे महत्त्व पटवून सांगितले. बचत गट कसा टिकवावा याचे मार्गदर्शन अरविंद जोशी यांनी केले.

या कार्यक्रमाला आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी घाडगे उपस्थित होते. दरम्यान, नेहरू युवा मंडळ वडोलीचे अध्यक्ष तानाजी गाङे पाटील व मान्यवरांच्या हस्ते बचत गटांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सुभाष चव्हाण, बापू वारे, सरपंच स्वाती चव्हाण, स्वाती सुरवसे, पोलीस पाटील धनाजी काळे, शंकर सुरवसे, रमेश बागाव, विकी मोरे, धनाजी बागाव, आदित्य मदणे, संकेत भाग्यवंत, भीमराव मोरे, प्रभाग समन्वयक सुषमा बिचकुले, तालुका व्यवस्थापक सलोणी जगले, आम्रपाणी मोरे, वैशाली भागवंत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकुश उपाळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *