कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह ; वैराग येथील १५ जण विलगीकरण कक्षात दाखल
बार्शी : वैराग ता.बार्शी येथे ३७ वर्षीय किराणा व्यापाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य विभाग व प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण वैराग येथे आढळल्याने बार्शी तालुक्यात मोठी खळबळ आहे .दरम्यान बार्शीचे तहसिलदार प्रदिप शेलार, नायब तहसिलदार संजीवन मुंढे , बार्शी गटविकास अधिकारी शेखर सावंत , वैरागचे तलाठी सतिश पाटील, बार्शी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड, वैराग वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत गुंड, ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर यांच्या पथकाने वैराग येथे आरोग्य बैठक घेतली. त्या व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या १५ जणांची आरोग्य तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले.
तर इतर १८ जणांचे इतर ठिकाणी विलगीकरण केले . याबाबत माहिती देताना तहसिदार प्रदिप शेलार यांनी सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्या त्या व्यापाऱ्यास पुणे येथे उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या ८ ते १० व्यापारी, दुकानातील व घरगुती कर्मचारी अशा १५ जणांची सासुरेफाटा येथील हॉस्पिटल मधे स्थापन केलेल्या संस्थात्मक विलगीकर कक्षात दाखल केले असल्याची माहीती त्यांनी बोलताना दिली.
तर वैराग येथील तो व्यापारी तेल, साखर व किराणा मालाचा ठोक व घाऊक विक्रेता आहे.त्याच्या संपर्कात मोहोळ, तुळजापूर, उत्तर सोलापूर, माढा व बार्शी या तालुक्यातील सुमारे ३०० ते ४०० किराणा व्यापारी व खरेदीदार आले आहेत. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ जणांना इतर ठिकाणी विलगीकरणाचे काम सुरू असल्याचे प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले. याबाबत पोलीस प्रशासनाकडून माहिती दिली की, दुकानाच्या टी.व्ही .फुटेजमधून प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यानुसार संपर्कातील लोकांना ताब्यात घेतले आहे. ही वार्ता शहरात प्राप्त होताच वैराग शहर पुर्ण लॉग डाऊन केले असून सर्व व्यवहार बंद झाले आहेत.
तर पोलीस, महसुल व आरोग्य प्रशासन वैराग मध्ये सतर्क झाले आहे. त्या व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेले वैराग, अकलूज येथील नातेवाईकही १८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल गेले आहेत. वैरागमधील एका व्यापारी रुग्णांच्या पॉझीटीव्ह अहवालाने वैराग शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.