पांगरी,दि.२२ : जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पांगरी ता. बार्शी येथे 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक माहिती अशी की, आज सकाळी 9:30 वाजता पांगरी पोलिस पांगरी शहरात पेट्रोलिंग करीत असताना बँक ऑफ इंडिया जवळ काही लोक गर्दी करुन थांबल्याचे दिसले त्या वेळी पोलिसांनी सरकारी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करुन गरडा घालून त्यांना ताब्यात घेतले.
बार्शी तालुक्यातील पांगरी येथे जमावबंदी गुन्हा ,6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी सदर इसमांना त्यांचे नाव व पत्याबाबत विचारना केली असता त्यांनी त्यांची नावे १) संजय भगवान काळे वय 51 वर्षे 2) सोमनाथ संभाजी नारायणकर वय 43 वर्षे 3) सुभाष मच्छिंद्र चांदणे वय 47 वर्षे 4) लक्ष्मण सुभाष सातनाक वय 39 वर्षे 5) तानाजी खंडू क्षिरसागर वय 58 वर्षे 6) संजय रामचंद्र पोपळे वय 49 वर्षे सर्व रा पांगरी ता बार्शी जि सोलापुर असे असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजानिक ठिकाणी लोकांची गर्दी करुन मिळून आल्याने त्यांचे विरुध्द भादवी कलम 188,महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायदा कलम 37(3),135 प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे.