fbpx

झाडबुके महाविद्यालयात कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय विभाग व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जगात थैमान घातलेल्या ओमिक्रोन या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटला थोपविण्याचे प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज गादेकर, उपप्राचार्य अशोक सुर्वे, पर्यवेक्षक प्रा. सुनील खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण शिबिरआयोजित करण्यात आले होते.

यावेळी कला विज्ञान व किमान कौशल्य विभागातील इयत्ता अकरावी- बारावी वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १९४ विद्यार्थिनींना तर ३५१ विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिनची मात्रा देण्यात आली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी कला शाखेतील लेफ्टनंट साजिद शेख प्रा. संदीप उबाळे, प्रा. गणेश नाकाडे, प्रा. योगीराज घेवारे, प्रा. मनोज गोंदकर, प्रा. भास्कर करडे, प्रा. वैशाली निंबाळकर, डॉ.दिपाली मोरे, प्रा.सतिश रणदिवे, प्रा.चंद्रकांत गायकवाड, प्रा.जलिल सय्यद, प्रा.अमोल उंबरे, प्रा. प्रतिभा माडजे, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाचे सुधीर घोडके, विकी मुसंडे, आरोग्य सेविका एम बी गीते, एम बी नलवडे, एस बी सुरवसे, आशा वर्कर्स सुप्रिया उंबरे, दिपाली बेताळे, मीनाक्षी व्हटकर, अनुराधा बागडे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *