fbpx

करमाळा येथील महिलेचा खुनाचा गुन्हा उघडकीस

कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर :
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी यातील मयत स्त्री ही रा. मौजे वीट ता. करमाळा सकाळी 10ः45 वा. च्या सुमारास शेतात कामाकरीता गेली होती, मयत स्त्रीचा मुलगा शाळा सुटल्यानंतर शेताकडे जात असतानाओढ्याजवळ त्याच्या आईचे चप्पल व स्कार्फ पडल्याचे दिसले. परंतू शोध घेवूनही आई कोठे दिसत नसल्याने म्हणून त्याने वडिलास फोनव्दारे कळविले,त्यावरून वडिल तेथे आले दोघांनी मिळून तिचा शोध घेतला असता तेव्हा सकाळी 10ः45 वा. ते दुपारी 02:45 वा. चे दरम्यान मौजे वीट ता. करमाळा येथील वीट ते मोरवड जाणारे जुन्या रोडजवळील ओढ्याजवळ बाभळीच्या झाडाखाली झुडपाचे आडोशास तिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने,अज्ञात कारणावरून दगडाचे सहायाने डोक्यात मारून गंभीर जखमी करून तिला जिवे ठार मारले आहे म्हणून अज्ञात व्यक्तीविरूध्द करमाळा पोलीस ठाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, विशाल हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे व इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या. सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकामी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोनि सर्जेराव पाटील यांनी त्यांचे नेतृत्वाखाली 03 पथके तयार करून त्यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकामी गांवात तळ ठोकून योग्य ती माहिती संकलित करणेकामी सुचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना स्था.गु.शा.सोलापूर ग्रामीण कडून नेमलेली 03 पथकास गावातून गोपनीय माहिती घेत असताना पथकास यातील मयत महीलेचा गावातील एका इसमासोबत वाद झाल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरून तपास पथकाने सदर संषयीत इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे व्यवसायिक व कौशल्यपूर्ण तपास केला असता, तो सतत विसंगत उत्तरे व माहिती देत होता.त्यावरून त्याचा अधिक संशय बळावल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून व कौशल्यपूर्ण तपास करता त्याने वादावादीतून सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी साततपुते, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील, सफौ.खाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, मोहन मनसावाले, विजयकुमार भरले, सलिम बागवान, बापू शिंदे, रवी माने, लालसिंग राठोड, सचिन गायकवाड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, पांडूरंग काटे, चालक समीर शेख, केशव पवार यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *