दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
अतिवृष्टीमुळे नाविंदगी परिसरात मोठ्या प्रमाणात पिंकांचे नुकसान
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी परिसरात कालपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा संततधार सुरूच आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

आधीच कोरोना माहामारीने जगाला कंगाल केला आहे. यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. आशात निसर्गाने देखील शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा चित्र आहे. सोलापूर जिल्ह्याला शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. चांगल्याप्रकारे हाताला आलेल्या पिकांची पावसामुळे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरीत भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.