आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी-परतीचा पाऊस जाता जाईना पावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरूप
कारी दि.15 : उस्मानाबाद तालुक्यातील कारी परिसरात परतीच्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतातील एका ठिकाणी त्याचा ढिगारा घातला आहे परंतु झालेल्या पावसामुळे सर्वच ठिकाणी पाणी साचले आहे सोयाबीन च्या या ढिगाऱ्याला चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे सोयाबिन काढणीचे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात तर मोठ्या प्रमाणात पाणी साचून सोयाबीन पाण्याखाली गेले आहे.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
द्राक्षे बागेतदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या कारी गावातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणी केली आहे द्राक्ष बागा ही चांगल्याप्रकारे फुटल्या आहेत सतत पाऊस चालू आहे पावसाने कसल्याही प्रकारे उघड दिलेली नाही या परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने बागायतदार अडचणीत आले आहेत.