दयानंद गौडगांव | कुतूहल न्यूज नेटवर्क
ओल्या दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची त्वरीत पंचनामे करून भरपाई द्यावी ; अक्कलकोट शिवसेना
अक्कलकोट: यंदा अक्कलकोट तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्याची त्वरीत पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी कृषी मंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे अक्कलकोट शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी केली आहे.
ना.भुसे सोलापूर येथे आले असता सोलापूर जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या आदेशानुसार अक्कलकोट सेना शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सेनेने दिलेल्या निवेदनात रब्बी हंगामासाठी बियाणे व खते तालुक्यातील प्रत्येक गावाकरिता उपलब्ध करुन द्यावेत. प्रत्येक गावासाठी किमान 50 हेक्टर पर्यंत कृषी विषयक प्रकल्प राबविण्यात यावेत. मृद व जलसंधारण योजनेतील झालेल्या सिमेंट बंधारेचे नुतनीकरण व्हावे. नवीन सिमेंट बंधारे, सामूहिक शेततळे हे खुल्या प्रवर्गासाठी देण्यात यावे. अनेक प्रकल्पांचे अनुदान प्रलंबित आहेत. ते तात्काळ मिळावेत. तालुका कृषी कार्यालयासाठी नवीन कृषी भवन शासकीय कार्यालय व फर्निचरसाठी निधी मिळावा. या बरोबरच कृषी कार्यालयाकरिता शासकीय वाहन मंजूर असून ते त्वरीत वितरित व्हावे. तालुक्याकरिता मंजूर 69 पदापैकी 31 पदे रिक्त आहेत. तालुक्याच्या भौगोलिक परिस्थिती पाहता कामाचा ताण वाढत आहे. याचा विचार करुन त्वरीत रिक्त जागा भरण्यात यावेत. अशा आशयाचे निवेदन ना.भुसे यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे प्रविण घाटगे सुर्यकांत कडबगावकर, इस्माईल जमादार, तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षा चव्हाण, शहर प्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुंभार, ग्राहक संरक्षण मंच ता.प्रमुख रजाक सय्यद, शहर प्रमुख सुरेश डिग्गे, प्रसिध्दी प्रमुख बसवराज बिराजदार, खंडू कलाल, राहुल चव्हाण, गणेश आळंगे, विनोद मदने, बासलेगावचे प्रगतशिल शेतकरी शिवपुत्र बिराजदार व सेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.