कुतूहल न्यूज नेटवर्क
महा ई सेवा व CSC केंद्र चालकांना उदरनिर्वाहसाठी निधी देण्यात यावा-अजित संचेती
पुणे : लाॅकडॉऊनमुळे महा ई सेवा केंद्र व सीएससी केंद्राना उदरनिर्वाहसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष अजित संचेती यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आज राज्यासह,देशावर कोरोनाचे मोठ संकट आले आहे,सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत,संपूर्ण देश लोकडाऊन केला आहे.दरम्यान बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ देखील होत आहे. त्यामुळे लाॅकडॉऊन वाढत जात आहे,महाराष्ट्रातील महा ई सेवा केंद्र व सीएससी ( COMMAN SERVICES CENTER) केंद्र धारक आज बिकट परस्थितीमध्ये आपला संसार चालवत आहेत, त्यांच्यावर उपवासमारीची वेळ येणे बाकी आहे,तरी दि. 25/03/2020 रोजी पत्र पाठवून पूर्ण माहिती आपणाला दिली होती.तरी आपण यावर आजपर्यंत या केंद्र चालकांसाठी कोणती योजना काढली नाही.आता या सर्व केंद्र चालकांचा अंत बघू नये,त्वरित आपण या सर्व केंद्र चालकांच्या उदरनिर्वाह साठी निधी उपलब्ध करून द्यावा,अन्यथा हे सर्व केंद्र चालक आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे खचून जातील.जर ही मागणी मान्य झाली नाही तर भारतीय राष्ट्रवादी पार्टी व सर्व केंद्र चालक हे रस्त्यावर येऊन येत्या 25/05/2020 रोजी महाराष्ट्र भर आंदोलन केले जाईल ,यास जबाबदार महाराष्ट्र शासन राहील,असे या निवेदनात नमूद केले आहे.