पिकांना फुटले कोंब, नुकसान भरपाई मिळण्याची मागणी
मुसळधार पावसामुळे कारी परिसरातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी परिसरात रोज पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.मुसळधार पावसामुळे गावातील साठवण तलाव,नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत, काढणीला आलेले सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेंगांना कोंब फुटू लागले आहेत.यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अमोल जाधव यांनी कुतूहल शी बोलताना सांगितले.

याबाबत पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीं शी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,पंचनाम्याची प्रक्रिया फार्म मित्र अँप द्वारे आमच्या अँप्लिकेशनला किंवा आमच्या ट्रोल फ्री नंबर वरती शेतकऱ्यांनी माहिती (इंटीमिशन) द्यायची आहे. त्यांना इंटीमेशन चा ट्रॅकर येतो आणि 72 तासाच्या आत अधिकारी येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील असे सांगितले.