कुतूहल न्यूज नेटवर्क
राजीव गांधी आश्रम शाळेचा विद्यार्थी दशरथ चौधरी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र
पांगरी प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १६ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी),या परीक्षेत पांगरी येथील राजीव गांधी केंद्रिय आश्रमशाळेतील विद्यार्धी दशरथ हनुमंत चौधरी पात्र झाला आहे.
मुख्याध्यापिका किरण बगाडे, उपमुख्याध्यापक रामकृष्ण मूळे,अधीक्षक वाहिद शेख,पर्यवेक्षक शैलजा राऊत,शिक्षक फिरोज मणेरी ,शिवाजी बगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.