कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: येथील मुस्लिम स्मशानभूमीत हायमास्ट दिव्याचे जामा मस्जिदचे अध्यक्ष शकुर शेख व सदस्य डॉ. आरिफ शेख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. “हा दिवा जिल्हा परिषदेच्या निधीतून मंजूर झाला आहे. तसेच या स्मशानभूमीत कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल.”, असे जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत यांनी सांगितले. यावेळी रेखा राऊत यांचा सत्कार सलमान सौदागर यांनी केला. यावेळी अन्सार आतार, आलम शेख, मुक्रम सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ आरिफ शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.