fbpx

बार्शी काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम मशीनला जिलेबी चक्र अर्पण…

कुतूहल न्यूज नेटवर्क

बिहार मध्ये लोकशाही हरली मशीन जिंकली – प्रकाश पाटील

बार्शी प्रतिनिधी : बार्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष जुगलकिशोर बापू तिवाडी, राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या संयोजन संकल्पनेतून बिहार निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनला जिलेबीचक्र अर्पण करून पाणउतारा मोहीम राबविण्यात आली. जगभरात सर्व प्रगत देशांमध्ये कागदी मतपत्रिकांचा वापर करून मतदान प्रक्रिया राबवण्यात येते मात्र भारतामध्ये जाणीवपूर्वक मतदान यंत्रांचा वापर केला जातो. बहुतेक ठिकाणी कोणतीही जिंकण्यायोग्य पार्श्वभूमी नसताना भाजपाचे उमेदवार निवडून आल्याचे तसेच बऱ्याच मतदान केंद्रांवर निवडणुकीवेळी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान यंत्राबाबत विविध ठिकाणी तक्रारी असताना, देशभरात बेरोजगारी, घटलेला विकासदर, नोटबंदी, जीएसटी, महामारीच्या उपाय योजनेला अपयशी ठरलेले केंद्र सरकारचे धोरण, तसेच सर्व स्तरावरून अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात देशभरात तीव्र संतापाची लाट असताना बिहार मध्ये लागलेला अनपेक्षित निकाल हा मतदान यंत्रांचा विजय असून बिहारमध्ये मतदान यंत्र जिंकली व लोकशाही हरली, असे उद्गार पानउतारा मोहिमे वेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी काढले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस तथा बार्शी विधानसभा प्रभारी दिलीप जाधव यांच्यासह बार्शी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तानाजी जगदाळे कार्याध्यक्ष सतीश पाचकुडवे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वशिम पठाण, सेवादल यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष निलेश मांजरे पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखिल मस्के, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महादेव स्वामी, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष महेश पवार, शहर सरचिटणीस ईश्वर व्हनकळस, जनाब जहीर बागवान, जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया समन्वयक ॲड. निवेदिता आरगडे ,महिला तालुका अध्यक्ष शिलाताई हिंगे,महिला जिल्हा सरचिटणीस अनिता बारंगुळे, महिला शहर अध्यक्ष सुनीता गायकवाड उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *