fbpx

खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी

विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिले निवेदन अनेक शेतकऱ्यांकडे नाही मोबाईल तर शेतात नेटवर्क गायब जिल्हा विमा प्रतिनिधी म्हणतात ऑनलाईन तक्रार करा

प्रतिनिधी आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क

कारी: उस्मानाबाद तालुक्यातील कारी परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांत पडलेल्या पावसामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

“उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. पंचनामे करत असताना महसूल आणि कृषि अधिकारी यांनी उपस्थित रहावे .” अमोल जाधव , तालुकाध्यक्ष जनहित शेतकरी संघटना

शेतकरी अनेक अडचणींना तोंड देत आहे यापूर्वीच दुबार पेरणीने शेतकऱ्यांचं कंबरडे मोडलेले असताना मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक विमा भरलेला आहे जिल्हा विमा कंपनी च्या प्रतिनिधी कडून शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार करण्यास सांगितले जाते परंतु अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल ची सुविधा नाही, शेतात नेटवर्क नाही अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे .यामुळे जिल्हाधिकारी यांनी बजाज फायनान्स कंपनीच्या विमा प्रतिनिधीना कारी गावातील शेतकऱ्यांचे नुसानीचे पंचनामे सरसकट करण्याबाबत आदेश द्यावे असे या निवेदनात म्हटले आहे .

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अमोल जाधव ,तालुका कृषी अधिकारी शेख, अनिल चौधरी, प्रमोद करळे, सतीश सारंग, मामा डोके, भाऊसाहेब विधाते, उमेश घाडगे, अभिजित काळे, माऊली जाधव, सागर येडवे आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *