बार्शी: बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील गावठाण डी पी दुरुस्ती करण्यात बाबत उपकार्यकारी अभियंता ग्रामीण उपविभाग बार्शी यांना महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले .
गेली १५ दिवस गावठाण डीपी (दलित वस्ती) बंद असल्यामुळे लोकांना अंधारात राहावे लागत आहे यांचा सामान्य लोकांना त्रास होत आहे. गावठाण येथील लाईट सुरळीत करण्यात यावी .अन्यथा संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल यांची नोंद महावितरण विभागाने घ्यावी .
या मागणीचे निवेदन अरविंद भाग्यवंत उपकार्यकारी अभियंता ग्रामीण उपविभाग बार्शी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, पत्रकार नितीन पाटील, किरण खुरंगळे, तुषार बारवकर, विश्वनाथ बारवकर, नितीन सरवदे व संस्थेचे पदाधिकारी या उपस्थित होते.