कुतूहल न्यूज नेटवर्क
जनावरांचा बाजार चालू करण्यासाठी शेतकरी संघटना व प्रहारची मागणी
बार्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महीन्यांपासून बंद असलेले जनावरांचे बाजार तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तहसिलदार किरण जमदाडे आणि प्रांताधिकारी हेमंत निकम यांना हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात शेतीसाठी आणि शेतीपूरक व्यवसायासाठी गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, बोकड, कोंबडी अशा जनावरांची घेवाणदेवाण होण्यासाठी जनावरांचे बाजार सुरू होणे गरजेचे असल्याने त्याची तात्काळ पूर्तता करावी. राज्याच्या पणन संचालकांनी जनावरांचे बाजार सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही अद्याप बाजार सुरू झाले नसल्याने अडचणीतील सर्वसामान्य शेतकरी संकटात सापडला असल्याचे म्हटले आहे.
कुतूहल न्यूज मध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात आणि पोहचा लाखो ग्राहकांपर्यंत. तसेच द्या आपल्या खास व्यक्तींना वाढदिवसाच्या व इतर शुभेच्छा.तेही फक्त 200 रुपयांत* संपर्क : 7020502856
यावेळी राजाभाउ गवळी, मनोज पवार, प्रदिप माळी, निजाम शेख, मंजूषा शिंदे, नाना फिस्के, अमोल घोडके, विकी जमदाडे, बाबा फिस्के, अनिल जमदाडे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी जनावरांचे बाजार सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास तहसिल कार्यालयात जनावरे बांधून तीव्र आंदोलन होणार आहे.