कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यातील ६५ वंचित गावांना अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्याची स्वराज्य शेतकरी महासंघाची मागणी
बार्शी: तालुक्यातील ६५ वंचित गावांना अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी निवासी जिल्हाधिकारी सोलापूर यांना स्वराज्य शेतकरी महासंघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.बार्शी तालुक्यात दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने बार्शी तालुक्यासाठी अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले होते.
बार्शी तालुक्यातील १३७ गावांपैकी ७२ गावासाठी अतिवृष्टीचे अनुदान वाटप, तसेच वितरित करण्यात येत आहे. पण तालुक्यातील ६५ गावे अतिवृष्टी निधी पासून वंचित आहेत.तालुक्यात अतिवृष्टी होऊन २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. शासनाने घोषणा केली होती की, अतिवृष्टीचे अनुदान दीपावली सणा मध्ये वाटप करण्यात येईल, दीपावली सण संपूर्ण 2 महिन्याचा कालावधी संपत आला आहे. तरी बेलगाव, मांडेगांव, चारे, खडकळगाव, ताडसौंदणे, धामणगाव आ, कापसी, सावरगाव, सर्जापूर, उंबरगे, आळजापूर, बावी आ, कासारवाडी, पिंपळगाव (पांगरी), तांबेवाडी, यावली, काटेगाव, पांगरी, वांगरवाडी, खांडवी, भानसळे, कव्हे, देवगाव, गोरमाळे, बाभुळगाव, पांढरी, तावडी, ममदापूर, नारी, खामगाव, पिंपळवाडी आ, गाताची वाडी, मानेगाव, शेलगाव मा, मिर्झनपूर, घारी, शेलगाव व्हळे, अरणगाव, भोयरे, ढेंबरेवाडी, नागोबाची वाडी, लक्षाचीवाडी, वालवड, उपळाई ठो, पफाळवाडी, चुंब, धोत्रे, पुरी, राळेरास, उपळे (दु), निंबळक, मळेगांव, नांदणी, कुसळब, जामगांव आर, वाणेवाडी, पाथरी, पानगांव, इंदापूर, सुर्डी, इर्ले, इर्लेवाडी, शेंदी, आलीपुर, दहिटणे. या ६५ गावांना अतिवृष्टी अनुदान मिळालेले नाही.
तरी जिल्हाधिकारी यांनी बार्शी तालुक्यातील वंचित गावासाठी अतिवृष्टीचा निधी, तहसील कार्यालय बार्शी यांच्याकडे वर्ग करून तो निधी तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. या मागणीचे निवेदन देते वेळी राहुल भड प्रदेशाध्यक्ष स्वराज्य शेतकरी महासंघ, श्रीकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर लोट, शाम जाधवर, बलभीम लाटे, उमाकांत भूमकर, सज्जनराव लाटे, धरमेंद्र गायकवाड, नितीन लाटे, तुकाराम सोनवणे आदी शेतकरी उपस्थीत होते.