पांगरी : मुंबई-पुणे-लातूर या महामार्गावर बारा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेले गाव..या गावात ग्रामीण रुग्णालय,पोलिस स्टेशन,उप डाकघर कार्यालय,पशुवैद्यकीय दवाखाना असे बरेच शासकीय कार्यालय आहेत.तसेच येथे विविध प्रकारचे दुकाने असून येथे आठवडा बाजार भरला जातो.पांगरी शेजारील १०-१५ गावांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पांगरीत यावे लागते.
पांगरीत वरिष्ठ महाविद्यालय व्हावे-विद्यार्थी व पालकांची मागणी
शैक्षणिक दृष्टया आपण विचार केला तर या गावात ४ ते ५ आंगणवाडया आहेत,१ ली ते ४ थी जि.प.प्राथमिक शाळा आहे.१ ली ते ७ वी जि.प ऊर्दू शाळा आहे,नर्सरी ते ५ वी इंग्रजी माध्यमाचे दोन शाळा आहे,५ वी ते १० वी माध्यमिक दोन शाळा आहेत,तसेच १ ली ते १० वी आश्रम शाळा आहे,११ वी -१२ वी आर्ट आणि सायन्स कनिष्ट महाविद्यालय आहे.
पण सद्या खरी गरज आहे ते एखादे वरिष्ठ महाविद्यालय होण्याची १ ली ते १२ वी पर्यंत पांगरी मध्ये उत्तम प्रकारे शिक्षण मिळते,पण १२ वी पास झालेले १०० ते १५० विद्यार्थी आपली पदवी पूर्ण करण्यासाठी अन्य शहरात जातात,काही विद्यार्थ्यांची आर्थिक पारिस्थिती चांगली असेल तर ते विद्यार्थी त्या शहरात खोली करून राहतात.पण ८०-९० टक्के विद्यार्थी रोज एसटी ने प्रवास करतात,विद्यार्थ्यांचे दिवसाचे 2-3 तास प्रवासात जातात अर्थात विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ कमी मिळतो,विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, त्यामुळे पांगरीत किमान एक तरी पदवी महाविद्यालय असावे असे विद्यार्थी व पालकांची मागणी आहे.