fbpx

बार्शीत खराब रस्त्यामुळे जेष्ठ नागरिकाचे पालिकेसमोर धरणे आंदोलन

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक ते हिंदू स्मशानभूमी हा रस्ता डांबरीकरण करावा, या मागणीसाठी जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब पवार यांचे बेमुदत धारणे आंदोलन सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून बार्शी नागरपालिकेसमोर हे आंदोलन सुरू आहे.

बार्शीतील धर्मवीर संभाजी चौक (जुनी वेस) ते हिंदू स्मशानभूमी हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त व खराब आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ते पवार यांनी हे उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाला नगरपालिकेत मंजुरी मिळाली असून निधी उपलब्धतेनुसार काम केले जाईल, असे पत्र मुख्यधिकारी यांनी आंदोलनकर्ते पवार यांना दिले आहे. प्रत्यक्षात काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन बंद करणार नाही, अशी भूमिका पवार यांनी घेतलेली आहे.

जेष्ठ नागरिकाचे खराब रस्त्यासाठी आंदोलन सुरू असताना बार्शी शहरातील सोशल मीडियावर झळकणारे आजी, माजी आणि भावी नगरसेवक या जनतेच्या प्रश्नाकडे आजिबात लक्ष देत नाहीत आंदोलनात सहभागी होत नाहीत, मग हे लोकप्रतिनिधी जनतेसाठी काहीही करू शकत नाहीत असे मत आंदोलनास पाठिंबा देणारे मानवाधिकार कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *