fbpx

खरीप पीक विम्याची रक्कम त्वरित जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन – शंकर गायकवाड

काशीनाथ क्षीरसागर : कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंगशी : बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची खरीप पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिला आहे ते मुंगशी (वा) येथे आयोजित शेतकरी बैठकित बोलत होते. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी त्याने भरलेल्या पिकाचा नुकसान भरपाई विमा कंपनीने तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावा नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही ते म्हणाले तसेच ७२ तासाची जाचक अट रद्द करून ज्या शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी रमेश क्षीरसागर, काशीनाथ क्षीरसागर, विकास क्षीरसागर, महादेव काशीद, सत्यवान क्षीरसागर, सोमनाथ क्षीरसागर, वसंत क्षीरसागर, हरिदास क्षीरसागर, रघुनाथ पवार, संतोष कोरे ,आनंत खंबे ,अभिमन्यू पासले ,रत्नजित क्षीरसागर, प्रविण घोडके, कुशाल क्षीरसागर, प्रमोद क्षीरसागर, सुहास क्षीरसागर, सेनापती क्षीरसागर, दत्तात्रय बडेकर, सुरज क्षीरसागर, राजाभाऊ क्षीरसागर , संतोष क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, बापूराव क्षीरसागर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *