कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: उस्मानाबाद येथे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग नियुक्त झालेले रावसाहेब मिरगणे यांचा सत्कार उपळाई रोड बार्शी येथील शिवसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. रावसाहेब मिरगणे हे मूळचे बार्शी तालुक्यातील मांडेगावचे सुपुत्र असून ते एक उत्तम प्रशासक म्हणून नावाजले जातात. (Deputy Education Officer Raosaheb Mirgane felicitated by Shivsai Pratishthan)
उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मिरगणे यांचा शिवसाई प्रतिष्ठानतर्फे सत्कार
यावेळी नारी गावचे पोलिस पाटील वैभव माळी, शेती मित्र गांडुळ खत प्रकल्प बार्शीचे संचालक ज्ञानेश्वर गुंड, वरिष्ठ सहाय्यक अमोल कातंगळे, शिवसाई उदयोग समूहाचे अभय पाटील, शिवाजी महाविद्यालय बार्शीचे प्रा. समाधान लोंढे, दप्तर कारकुन जवळगाव मध्यम प्रकल्प बार्शीचे रत्नाकर कांबळे, संदीप पाडुळे, राजेश तालीकोटी, नागेश चव्हाण, कुंदन कुलकर्णी उपस्थित होते.