आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
डॉ.देवेंद्र डोके यांची भाजपाच्या बार्शी तालुका डॉक्टर सेल अध्यक्षपदी निवड
कारी प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टीच्या बार्शी तालुका डॉक्टर सेल अध्यक्ष पदी कारी येथिल डॉ. देवेंद्र रामलिंग डोके यांची निवड करण्यात आली.काल बार्शी येेेथे भाजपाच्या विविध पदांच्या निवडी करण्यात आल्या व त्यांना निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत, बार्शी तालुका अध्यक्ष मदन दराडे, बाजार समितीचे संचालक शिवाजी दादा गायकवाड, पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले , शहराध्यक्ष महावीर कदम, संजित डोके, सचिन शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख व बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे ध्येय धोरणे, केंद्राच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवनार असल्याचं बार्शी तालुका डॉक्टर सेल नूतन अध्यक्ष डॉ. देवेंद्र डोके यांनी कुतूहल शी बोलताना सांगितले.