दत्तात्रय घावटे : कुतूहल न्यूज नेटवर्क
मध्यमवर्गीय लोक व शिक्षणाच्या दृष्टीकोनातून निराश करणारा अर्थसंकल्प – डॉ.प्रतापसिंह पाटील
उस्मानाबाद : मध्यमवर्गीय लोक व शिक्षणाच्या दृष्टीकोनातून निराश करणारा अर्थसंकल्प असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये कोरोना नंतरच्या परिस्थितीचा विचार न करता प्राप्ती करांमध्ये कोणतीही घट केली नाही. त्यामुळे पाच ते दहा लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना देखील पंधरा टक्के कर भरावा लागणार आहे. त्यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणाऱ्या सोलापूर – तुळजापूर रेल्वेमार्गासाठी या बजेटमध्ये काही तरतूद होईल ही अपेक्षा होती. मात्र, ती ही अपेक्षा सरकारकडून पूर्ण झालेली नाही. त्यासोबतच कोरोना नंतर शैक्षणिक परिस्थिती बदललेली आहे या बदलत्या परिस्थितीतीवर उपाययोजना करण्यासाठी किंवा शिक्षणाच्या नविन पध्दती अवलंबण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. देशभरात शंभर सैनिकी शाळा उभा करणार असे घोषित केले असले तरीही संख्या देशाच्या दृष्टीकोनातून खुपच कमी आहे असे पाटील म्हणाले.