कुतूहल न्यूज नेटवर्क
ग्राहक समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने दीपावली निमित्त गरजूंना धान्य वाटप
मोहोळ प्रतिनिधी : कोरोना ,अतिवृष्टी व भीमा नदीला आलेला पूरामुळे बेगमपूर (ता.मोहोळ) या भागातील लोकांचे अतोनात हाल झाले.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे खूप नुकसान झाले आहे.त्यांची दिवाळी साजरी व्हावी म्हणून ग्राहक समितीच्या वतीने गरजूंना धान्याचे वाटप प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष कोल्हाळ,मोहोळ तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष महादेव जाधव, जिल्हा संघटक प्रमोद लांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश भालेराव आदी मान्यवरांसह गावातील महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.