कुतूहल न्यूज नेटवर्क
मधुबनच्या १२ व्या वर्धापन दिनी १२ ट्रॅक्टर्सचे वितरण; नविन ५०५० डी फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरचे अनावरण
बार्शी : जॉन डीअर या जगप्रसिध्द ट्रॅक्टर उत्पादक कंपनीचे बार्शी व उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिकृत वितरक मधुबन ट्रॅक्टर्सचा १२ वा वर्धापन दिन १२ ट्रॅक्टर्सचे ग्राहकांना वितरण करुन साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीच्या नविन ५०५० डी फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरचे अनावरण करण्यात आले. कंपनीचे महाराष्ट्राचे क्षेत्र व्यवस्थापक अंकित सक्सेना, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक कैलास तासकर, व्यूहकीय व्यवस्थापक सावदिप बावा, मधुबनचे संचालक प्रविण कसपटे, जॉन डीअर पतपुरवठा प्रतिनिधी, कर्मचारी, शेतकरी, ग्राहक यांच्या उपस्थितीत तपपुर्ती वर्धापन दिनाचा कार्यक्रम रंगला. संचालक प्रविण कसपटे यांच्यावर यावेळी उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
मधुबन ट्रॅक्टर्स गेल्या १२ वर्षा पासून बार्शी तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जॉन डीअरचे यशस्वी वितरक म्हणून कार्यरत आहेत. जॉन डीअरच्या ट्रॅक्टर्सच्या विक्री व विक्री पश्चात सेवेतील उल्लेखनीय कामगिरी बद्दल मधुबन ट्रॅक्टर्सला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गतवर्षी महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक व्रिकी करुन त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. वित्तपुरवठ्यामध्येही मधुबनची कामगिरी सर्वोच्च आहे. जॉन डीअरच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या ट्रॅक्टर्सची विक्रमी विक्री आणि कार्यक्षम सेवा या क्षेत्रात मधुबनचे संचालक प्रविण कसपटे यांच्या नेतृत्वाखाली ६५ कर्मचारी सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. वर्धापन दिनाच्या औचित्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विक्री व सेवे मध्ये सर्वोच्च कामगिरी करणार्या व सेवाज्येष्ठ कर्मचार्यांना गौरविण्यात आले. मधुबन ट्रॅक्टर्सचा ग्राहकांमधील फिडबॅक प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार यावेळी उपस्थित मान्यवरांनी काढले. कंपनीच्या एकाहून एक सरस कामगिरी करणार्या विविध मॉडेलच्या ट्रॅक्टरची यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली.