fbpx

बार्शीतील उड़ान फॉउंडेशनच्या वतीने 500 गरजूंना ईदच्या सामानाचे वाटप

मनाने को तो सभी ईद की खुशीया मानते हे,
लेकिन हमारे ईद की अदा सब से निराली हे!

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी: मागील पाच वर्षांपासून बार्शीत उड़ान फॉउंडेशनने रक्तदान शिबिर, व्याख्यान असे अनेक उपक्रम यशस्वी रित्या राबवत आहे. त्यातच आता एक कौतुकास्पद उपक्रम आयोजित केले. ज्यात 500 गरजू, गरीब व विधवा स्त्रियांना ईद उल-फ़ित्र चे सामान म्हणजेच काजू, बदाम, चारुळे, पिस्ता, खसखस, मनुके, शेवया, खजूर, गूळ देन्यात आले. विशेष म्हणजे हे दान गुप्तपद्धतीने करण्यात आले.

बार्शी शहरातील नव्या दमाच्या मुस्लिम युवकांनी स्थापन केलेली उड़ान फॉउंडेशन ही एक सामाजिक संघटना. तसे पाहता बार्शी शहरात अनेक सामाजिक संघटना असून प्रत्येक संघटना हे बार्शीकरांच्या मदतीला धावून येते. उड़ान फॉउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य हे  सामान्य कुटुंब, सामान्य परिस्थिती, कष्टकरी परिवाराची पार्श्वभूमी असणारे तरीदेखील सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे.

लाभार्त्यांची निवड गरजू, गरीब, विधवा, विव्यांग अशा पात्रतेच्या आधारे विभागाच्या स्वयंसेवकांनी केली व त्याना कुपन वितरित केले. त्यानंतर सामानाचे पाकीट दिले व निरोप दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उड़ान फॉउंडेशन अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, जफर शेख, अय्युब शेख, शोयब काजी, मुन्ना बागवान, जमील खान, इन्नुस् शेख, मोईन नाईकवाड़ी, वासिम मुलानी, तौसीफ बागवान, शब्बीर वस्ताद, शकील मुलाणी,बाबा शेख, अँड.रियाज शेख, जावेद शेख, जिलानी शेख, साजन शेख, रोनी सैय्यद, मोहसिन पठान, इकबाल शेख, हाजी शिकलंकर, जमीर तांबोली, समीर शेख, अल्ताफ शेख यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *