fbpx

शिराळे येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी : बार्शी तालुक्यातील शिराळे गांवामध्ये स्वयंम शिक्षण प्रयोग या संस्थेकडून अन्नधान्य वाटप करत निराधारांना आधार देण्यात आला. जीवनावश्यक असलेल्या सर्व बाबी गावातील प्रत्येक व्यक्तीला मिळतील याची खबरदारी घेत आहेत. एस.एस.पी. संस्थेच्या वतीने सुमारे एकोणीस अन्नधान्य, मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करत सदर वाटप करण्यात आले.

वाटप प्रसंगी पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट, संस्थेचे क्लस्टर समन्वयक संगीता चांदणे, तालुका व्यवस्थापक राजकुमार शिंदे, सरपंच सुप्रिया चौधरी, ग्रामसेवक मंगेश जगदाळे , पोलिस पाटील रेखा चंदनशिवे इ. उपस्थित होते. सदर आयोजनाकरीता संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने,ट्रेनिंग मॅनेजर काकासाहेब अडसूळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेच्या सहकार्याने गावात “अँटी कोरोना टास्क फोर्स” ची बांधणी करण्यात आली. गावात कडक नियम तयार करत नवीन नियमांची आखणी करण्यात आली. विनाकारण फिरताना आणि मास्क न लावता घराबाहेर आढळल्यास 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वयंसेवक कार्य करणाऱ्यास कोरोना संकट निवारणानंतर गौरविण्याचा विचार झाला. संस्थेच्या राजकुमार शिंदे , संगीता चांदणे यांनी नियमांची बांधणी करण्यास मदत केली.


ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय उभारणीसाठी तांत्रिक सहकार्य करत स्वयम शिक्षण प्रयोग ही संस्था भारतभर सात राज्यात काम करत आहे. संस्थेचे ग्रामीण उद्योजगता विकास कार्यक्रम प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनासोबत उमेद अभियानांतर्गत काम चालू आहे. संस्था 1993 पासून आज तागायत समाज कार्यात अविरत कर्तव्यदक्ष तत्पर आहे. 1993 पासून स्वयम शिक्षण प्रयोग ही संस्था तळागाळातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. संस्थेने महिलांच्या भागीदारीमध्ये मजबूत पूरक वातावरण तयार केले आहे. ज्यामुळे महिला उद्योजकता, नेतृत्व विकास आणि शाश्वत विकासासाठी मदत होत आहे. संस्थेने आज पर्यंत 1लाख 70 हजार महिला उद्योजक , शेतकरी आणि सामाजिक लीडर सक्षम केले आहेत. जे की यांच्या माध्यमातून 5.5 दशलक्ष लोकांवर सकारात्मक परिणाम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *