कुतूहल न्यूज नेटवर्क-विजयकुमार मोटे
पंढरीत झुआरी सिमेंट च्या वतीने अन्नधान्य कीट चे वाटप
पंढरपूर : सध्या कोरोनामुळे आर्थिक स्थिती अडचणीत असणारे अनेक कुटुंब आहेत.अशा परिस्थीतीत झुआरी सिमेंट कंपनीने पंढरपूर तालुक्यातील 300 लोकाना दरमहा धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.याची सुरवात आज गुरुवारी पंढरपूर येथील शहर पोलीस स्टेशनमधून करण्यात आले.
या धान्य किटमध्ये घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदरच्या धान्य किट चे वाटप पंढरपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंढरपूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत भैय्या देशमुख,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार,झुआरी सिमेंट कंपनी चे हर्षल तरटे, मोहक गांधी, अगस्ती देठे. अजित पवार यांच्यासह झुआरी सिमेंट कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
झुआरी सिमेंट कंपनीच्या वतीने प्रत्येक पोत्यामागे एक रुपया हा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वाटप करण्यासाठी काढून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .त्या पद्धतीने अन्नधान्य वाटप चालू ठेवले आहे.
अशा प्रकारे या झुआरी सिमेंट कंपनीच्या वतीने ग्रामीण भागातही हे कीट वाटप करण्यात येणार असल्याचे कंपनीचे वतीने हर्षल तरटे यानी सांगितले आहे.