बार्शी : कुतूहल न्यूज नेटवर्क
पंचशील तरुण मंडळ व लोकमान्य चाळ तरुण मंडळ बार्शी यांच्यावतीने गरजूंना अन्नधान्याचे वाटप
बार्शी येथील पंचशील तरुण मंडळ यांच्यावतीने गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.सध्या लाॅकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे याच पार्श्वभूमीवर लोकमान्य चाळ येथे राहणाऱ्या 60 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य (दाळ, तांदूळ ,साखर ,तेल ,चहा पावडर ) इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लोकमान्य चाळ तरुण मंडळ व पंचशील तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.