कुतूहल न्यूज नेटवर्क- आसिफ मुलाणी
अंबेजवळगे गावात होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगे गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने भारतीय जनता पक्षाचे तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील 1000 कुटुंबाला आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी जाधव,माजी सरपंच राजेसाहेब देशमुख,लक्ष्मण जाधव, आगरचंद शिंदे , निलेश शिंदे आदी उपस्थित होते.