कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: आसिफ मुलाणी
कोरोनाच्या संकटामुळे अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषाने शेती कर्जाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील रोजगार बंद झाला. यामुळे रोज चूल कशी पेटणार आणि पोटाची खळगी कशी भरणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रार्थना फाउंडेशन कडून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
अशातच सोलापुरातील प्रार्थना फाउंडेशनने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना काळात गरजू 100 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना संस्थेच्या माध्यमातून घरपोच किराणा साहित्य देण्याचा प्रयत्न आहे. कारी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रार्थना फाउंडेशनचे प्रमुख प्रसाद मोहिते, दीपक डोके, शिवराम वाघे यांच्यासह प्रार्थना फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
हीच वेळ आहे एकमेकांना सोबत देण्याची आहे, आपण ही एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकता. आपण आपली मदत संस्थेच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता…
Prathana Foundation/प्रार्थना फाऊंडेशन
IDBI बँक
A/c : 0410104000158862
IFSC : IBKL0000410
Branch: Vijapur road
फोन पे नं : 9545992026
गूगल पे नं : 9049063829
मी स्वतः एक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आहे त्यामुळे मला या कुटुंबातील समस्या मी जवळून पहिल्या आणि अनुभवल्या आहेत. कोरोनाच्या काळात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे खूप हाल होत असल्याचे जाणवले म्हणून या कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा किराणा घरपोच करण्याचे ठरवले आणि प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून हे काम हाती घेतल. समाजातील दानशूर लोकांनी या साठी पुढाकार घ्यावा. प्रसाद मोहिते, अध्यक्ष प्रार्थना फाउंडेशन.