आसिफ मुलाणी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी: कारी ता उस्मानाबाद येथे शारिनी फाउंडेशन मार्फत श्री शिवाजी विद्यालय व शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना एन-९५ मास्कचे वाटप करण्यात आले.
कारी येथील महाविद्यालयात एन-९५ मास्कचे वाटप; शारिणी फाउंडेशनचा उपक्रम
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एस. भुसारे होते. यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू विषयी जनजागृती करण्यात आली. त्याबद्दल खबरदारी पाळणे, मास्कचा वापर करणे, महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाविषयी माहिती सांगण्यात आली.
यावेळी इब्राहिम काझी, दादासाहेब गायकवाड, परीक्षितराजे विधाते, संभाजी बनसोडे, मंगेश शिंदे, आम्रपाली पाटील, चंद्रकांत करळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए . एम. जोशी तर आभार आर . सी.आगलावे यांनी मानले.