fbpx

मालवंडी येथील अंगणवाडीत कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे दत्तक बालक श्रेणी वर्धन योजना अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी शेख, बाल प्रकल्प विकास अधिकारी सुधीर ढाकणे, तडवळे बीटच्या पर्वक्षिका अनुराधा मिस्कील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडी क्रमांक एक ते चार या अंगणवाडीतील २५ कुपोषित कमी वजनाच्या बालकांची प्रतिकार शक्ति वाढावी म्हणून श्रेणी वर्धन होण्यासाठी पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

यावेळी अंगणवाडी सेविका रेणुका राजगुरू यांनी बालकांच्या पालकांना मार्गदर्शन केले. कुपोषित बालकांना खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन,  अतिरिक्त पोषण आहार खाऊ घालून त्यांना सुदृढ करणे खूप महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन केले. या पोषण आहारासाठी ग्रामपंचायततर्फे तसेच ग्रामस्थांकडून पोषण आहारासाठी निधि देण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब काटे, सरपंच हनुमंत होनमाने, उपसरपंच विष्णू चव्हाण,  ग्रामपंचायत सदस्य संतनाथ खंडागळे, राम घेवारे, नवनाथ गवळी, लहू काटे, सुनील सलगर, अंगणवाडी सेविका दीपाली यादव, आशा क्षिरसागर, राणी सरवदे, सुरेखा काटे, प्रभावती भागवते, रेणुका राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका जयश्री उकरंडे तर आभार जिजाबाई यादव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *